Breaking News

पनवेलमध्ये दुकाने सुरू झाल्याने व्यापारी संघटना, जनतेत समाधान; पनवेल मनपातील सत्ताधारी भाजपला धन्यवाद

पनवेल : वार्ताहर

पनवेल महापालिका हद्दीत जीवनावश्यकखेरीज इतर दुकानेही सुरू करावीत, अशी सूचना महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आयुक्तांकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने ठरवून दिलेल्या वारानुसार सकाळी 7 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान ही दुकाने उघडण्याची परवानगी दिली. त्या अनुषंगाने शहरातील व्यापार्‍यांना अनेक दिवसापासूून बंद असलेली दुकाने नियमांप्रमाणे उघडण्यात आली. त्यामुळे व्यापारीवर्गात आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त

होत आहेे.

गेले दोन महिन्यामध्ये देशभरात कोरोनाने थैमान घातले असताना कोरोनाचेे रुग्ण वाढीस लागल्यामुळे शासनाने लॉकडाऊन केला. त्याचबरोबर कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडून पडली. त्यावर कोरोनामुक्त होण्यासाठी शासन आणि शासकीय अधिकार्‍यांनी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू ठेेवली. त्यामध्ये महसूल अधिकारी, त्याचबरोबर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेेने आपले प्रयत्न चालू ठेवून कोरोना नियंंत्रणात आणण्यासाठी भर दिला, परंतु पनवेेल महापालिकेच्या हद्दीत बाहेरुन मुंबईमधून येेणार्‍या-जाणार्‍या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागला होता. त्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अशा नागरिकांची राहण्यासाठी व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करावी, अशी मागणी केली. दुसरीकडे पनवेल महापालिका हद्दीत जीवनावश्यकखेरीज इतर दुकानेही सुरू करावीत, अशी सूचना महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आयुक्तांकडे केली होती. त्याला प्रतिसाद आयुक्त गणेश देशमुख यांनी लॉकडाऊन काळात बंद असलेली दुकाने पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करून ती दुकानेे सुरू केली. त्यामुळे व्यापारीवर्गात व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Check Also

पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली …

Leave a Reply