अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य आणि रायगड जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 22) अलिबाग येथे राज्य अजिंक्यपद क्रॉस कंट्री स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमधून तेलंगण करीमनगर येथे होणार्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येणार आहेत.
राज्यस्तरीय स्पर्धा पुरुष व महिला 10 किमी, 20 वर्षांखालील मुले 8 किमी, 20 वर्षांखालील मुली 6 किमी, 18 वर्षांखालील मुले 6 किमी, 18 वर्षांखालील मुली 4 किमी 16 वर्षांखालील मुले व मुली 2 किमी या गटांत व अंतरात होणार आहे. राज्यातून जवळपास 650 खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
जे. एस. एम कॉलेज मैदान अलिबाग बीच येथून स्पर्धेला सकाळी 6.30 वाजता सुरुवात होणार आहे, तर बक्षीस वितरण सकाळी 10 वाजता होईल. स्ट्रायडर्स या भारतातील अग्रगण्य मॅरेथॉन ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रायोजित करण्यात येते. या वेळी ‘नाडा’चे डॉक्टरदेखील उपस्थित राहणार आहेत.
Check Also
पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार
महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 …