Breaking News

प्रकाश खोपकर यांना जि. प. कर्मचार्यांकडून निरोप

अलिबाग : प्रतिनिधी – रायगड जिल्हा परिषदेच्या सामन्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांची धुळे जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांना शुक्रवारी (दि. 7) जिल्हा परिषद कर्मचारी संघटना व अधिकारी यांच्यातर्फे निरोप देण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या स्व. प्रभाकर पाटील सभागृहात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. जि. प. अध्यक्ष योगिता पारधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित सोमवंशी,  जि. प. सदस्य प्रभाकर म्हात्रे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, अलिबागच्या गटविकास अधिकारी दीप्ती पाटील, नितीन मंडलिक आदी कार्यक्रमास उपस्थित होते.

जिल्हा परिषद संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, पाणी व स्वच्छता विभागाचे जयवंत गायकवाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी दत्तात्रेय पाथरुट, पशुसंवर्धन अधिकारी बंकट आर्ले, मेघा म्हात्रे यांनी मनोगत वक्त करून खोपकर यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व आभार अमरदीप ठोंबरे यांनी केले.

माझा जन्म रायगडमधला आहे. या मातीशी माझे नाते आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरचा माझा निरोप समारंभ रायगड जिल्ह्यातच करणार.

-प्रकाश खोपकर

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply