Breaking News

माणगावमधील दुकानांच्या वेळापत्रकात बदल; भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या मागणीला यश

माणगाव ः प्रतिनिधी

माणगाव शहरासह तालुक्यातील गरजेच्या असणार्‍या दुकानांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून चौथ्या लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच माणगावमधील गरजेची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत शासनाच्या सूचनेनुसार सुरू राहतील, अशी माहिती नगरपंचायतीतर्फे दुकानदारांना देण्यात आली आहे. त्यामुळे दुकाने सुरू करण्याच्या वेळापत्रकात बदल झाल्याने माणगावमधील जनतेने भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांचे विशेष आभार मानले आहेत.    माणगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांतील दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12-1 वाजेपर्यंत रविवारपर्यंत सुरू होती. शासनाने गरजेची सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहतील, अशी अधिसूचना काढली होती, मात्र माणगावसह अनेक गावांतील स्थानिक स्वराज्य संस्था या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपलीच हुकूमत चालवत होत्या. केवळ पाच तास दुकाने उघडी राहत असल्याने माणगाव ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्याने या ठिकाणी गर्दीचे प्रमाण वाढत होते. याकडे भाजपचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी लक्ष वेधून तालुक्यातील दुकानांच्या वेळापत्रकात बदल करून शासनाच्या सूचनेनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत दुकाने सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या मागणीला यश येऊन माणगावमधील गरजेची दुकाने सोमवारपासून सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू करण्यात आल्याने दुकानदारांसह तालुक्यातील जनतेने भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांचे आभार मानले आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply