Sunday , September 24 2023

चवदारतळे सत्याग्रहनिमित्त भीमरत्न पुरस्कार जाहीर

महाड : प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या क्रांतिदिनाचा 92 वा स्मृतिदिन 20 मार्च रोजी साजरा होत आहे. कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीने या वर्षापासून भीमरत्न पुरस्कार दिले जाणार आहेत.

कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीने पाच नामांकित आणि कर्तृत्ववान व्यक्तींना भीमरत्न पुरस्कार  जाहीर केला असून हा सोहळा महाडमध्ये 20 मार्चला बुटाला सभागृह, महाड क्रांतिभूमी येथे होणार आहे. अ‍ॅड. बी. जी. बनसोडे (भीमा-कोरेगाव, खैरलांजी आणि शोषितांचे वकील), चंद्रकांत बी. भंडारे (इंदू मिल डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक प्रणेते), अनिकेत म. साळवी (दक्षिण आफ्रिका ब्रीक परिषदेचे नेतृत्व करणारे), प्रा. डॉ. ज्ञानोबा तु. कदम (कोकणातील 550 बुद्ध लेणी संशोधक) आणि सामाजिक कार्यकर्ते लेखक दादाभाऊ अभंग यांचा भीमरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे हे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील. या सोहळ्याचे उद्घाटन आणि क्रांतिस्तंभाला मानवंदना उद्योगपती शहाजी जावीर देणार आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आंबेडकर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय खैरे, राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते कॉ. शैलेंद्र कांबळे, प्रा. डॉ. रेश्मा मोरे, तहसीलदार

प्रफुल पुरळकर, राष्ट्रीय लेखक-सामाजिक कार्यकर्ते कॉ. सुबोध मोरे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेचे मुख्य सचिव दीपक पवार, कार्याध्यक्ष चंद्रकिरण सकपाळ, उपाध्यक्ष संघराज तांबे

यांनी दिली.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply