Sunday , September 24 2023

सोशल मीडियावरील प्रचाराला आचारसंहितेचे चटके चौकटी सांभाळून कार्यकर्त्यांची प्रचाराला सुरुवात

पेण : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप आघाडी व शिवसेना-भाजप युती यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात टक्कर होणार हे निश्चित झाले आहे. आघाडी-युतीच्या उमेदवारांनीही तयारी सुरू केली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास 28 मार्चपासून सुरुवात होत असली, तरी आघाडी व युतीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रचार सुरू केला आहे, तर जागृत मतदार आतापासूनच आपले मत विकू नका, पाच वर्षात मतदारांकडे फिरकून न बघणार्‍या उमेदवारांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन सोशल मीडियावर करीत आहेत. व्हॉटसअ‍ॅप,

फेसबुकवर निवडणुकीच्या अनुषंगाने अशा अनेक पोस्ट झळकू लागल्याचे चित्र दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो की, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका असो. निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा अगदी पुरेपूर उपयोग उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. सोशल मीडियावरील प्रचारासाठी निवडणूक आयोगाचे बंधन आहे. आचारसंहितेच्या काही चौकटीही आहेत, मात्र या सर्व चौकटी सांभाळून उमेदवार व कार्यकर्ते प्रचारासाठी सोशल मीडियाचा पूर्ण वापर करून मतदारांपर्यत पोहोचू लागले आहेत. यातच आता लोकसभेची निवडणूक असल्याने येथील राजकारणाचे चित्र मांडणार्‍या पोस्ट शेअर केल्या जात असल्याचे दिसत होते. हे चित्र बदलून आता कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाद्वारे प्रचाराला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचाराला सर्व सामान्यांचाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मुक्त व्यासपीठ असलेल्या सोशल मीडियावरून मतदारांकडून कमेंटच्या माध्यमातून कधी शाबासकीची थाप, तर कधी कानपिचक्याही काढल्या जात असल्याचे दिसून येते.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply