नंदुरबार : प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू आणि 35 प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. 21) मध्यरात्री घडली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंकल ट्रॅव्हल्सची खासगी बस 40पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन जळगावहून सुरतच्या दिशेने जात होती. ही बस सुरत राष्ट्रीय महामार्गावरून नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात रात्री 3च्या सुमारास आली असता, दर्ग्याजवळ असणार्या पुलावरून दरीत कोसळली. त्यामुळे परिसरात मोठा आवाज झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मदतकार्य राबवत जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …