Breaking News

नऊ बिनविरोध सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ जणांनी सोमवारी (दि. 18) आमदारकीची शपथ घेतली. यात भाजपच्या चार, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. कोरोनाचे संकट असल्याने विधिमंडळात साधेपणाने हा शपथविधी झाला.
भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, नीलम गोर्‍हे, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे राजेश राठोड बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आमदारकीची शपथ दिली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply