Breaking News

एक्स्प्रेस वेवर वाहनचालकांना लुटणारी टोळी गजाआड

पनवेल : वार्ताहर

पनवेलजवळून जाणार्‍या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रात्री अपरात्री वाहनचालकांना धाक दाखवून दरोडा व जबरी चोरी करणार्‍या एका टोळीला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने गजाआड केले आहे. या टोळीकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत साजिद कयूम अन्सारी (वय 30) टँकर (एमएच 12 एन एक्स 8881)ने मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेने पुणे येथे जाताना एक्सप्रेस या 1800 कि. मी. अंतरावर आले असता 20 ते 25 वयोगटातील तरुणांनी टँकर अडवला व साजिदला मारहाण करून ज्याच्या खिशातील रोख रक्कम व मोबाइल फोन काढून ते पसार होत होते. या वेळी त्यांनी प्रतिकार केला असता त्यांच्याकडे असलेल्या दांडक्याने कपाळावर मारहाण केली व ते पळून गेले. अशाच प्रकारे या टोळक्यांनी दुसर्‍या टेम्पोचालकासही लुटले होते. या संदर्भात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला असता एक संशयित व्यक्ती खालापूर व उरण परिसरात मोबाइल विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली.

तांत्रिक तपासात या व्यक्तीचा प्रस्तुत गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली. त्यांच्याकडून त्याच्या चार साथीदारांची माहिती घेऊन आरोपींना शिताफिने अटक करण्यात आली. त्यामध्ये संजय पवार (वय 30), कुमार पवार (वय 23), अविनाश धारपवार (वय 20), रितेश जाधव (वय 18) (हे सर्व रा. खालापूर) व अक्षय यावर (वय 21, रा. मोहोपाडा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विविध कंपनीचे 29 मोबाइल, तसेच मोठ्या प्रमाणात रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली.

ट्रकचा अपहार करणारे जेरबंद

पनवेल : वार्ताहर – विश्वास संपादन करून ट्रकचा अपहार करणार्‍या एका टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी जेरबंद केल्याने सहा मोठे गुन्हे उघडकीस आणण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यशस्वी झाले आहेत.

विनोद रामराव पवार यांनी ट्रकचे मुळमालक सुधाकर गायकवाड यांच्याकडुन करारनामा करून विकत घेतलेला टाटा कंपनीची ट्रक (बल्कर) एमएच 13 एएक्स 4109 हा एच. पी. पेट्रोलपंपाच्या बाजुला पुणेकडे जाणार्‍या रस्त्यावर अजिवली या ठिकाणी पार्क करून ठेवलेला होता. या वेळी ट्रकवरील चालक अजिम सलीम पठाण अजिम सामीलखाँ पठाण (रा. रहेमतपुर, जि. सातारा) याने लबाडीच्या इराद्याने ट्रक चोरी करून नेला अशा आशयाची फिर्याद प्राप्त झाल्याने पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रस्तुत गुन्हयाच्या तपासादरम्यान यातील आरोपी अजिम सलीम पठाण यास तांत्रिक तपासाचे आधारे खारघर येथून अटक करण्यात आली.

आरोपीकडे चौकशी केली असता त्याने हा ट्रक लोकेश एस. सांजिवैय्या (वय 35, रा. कर्नाटक) व झाकीर हुसेन मोहम्मद साब परदेवाले (वय 45, रा. कर्नाटक) यांना विक्री केल्याचे सांगितले. या आरोपींना बेंगलोर व कर्नाटक येथून अटक करण्यात आली. गुन्ह्यात चोरी केलेला ट्रक हा कोटा (राजस्थान) येथे विक्री केल्याचे आरोपींनी सांगितले. चोरी झालेला 20 लाख रुपयांचा टाटा कंपनीचा 14 चाकी ट्रक (बल्कर) भिलवाडा (राजस्थान) येथुन हस्तगत करण्यात आलेला आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply