Breaking News

आमदार गोपीचंद पडळकर शिंग्रोबाचरणी नतमस्तक

खालापूर : प्रतिनिधी – धनगर समाजाचे डॅशिंग नेतृत्व, आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि. 19) धनगरांचे आराध्य दैवत असलेल्या शिंग्रोबाच्या बोरघाटातील वीर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी त्यांनी नारळ फोडून देवाकडे साकडे घातले.

गोपीचंद पडळकर आमदार झाल्याने धनगर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिंग्रोबा कमिटीच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी धनगर समाजाचे नेते बबन शेडगे, युवा नेते दत्ताभाऊ शेडगे, नारायण हिरवे, बापू बावदाने, मारुती शेडगे आदी

उपस्थित होते.

प्राचीन काळापासून हे शिंग्रोबा देवाचे मंदिर असून या मंदिरात अजूनही वीज पोहोचू शकली नाही याची खंत आम्हाला वाटत असून, येथे वीजपुरवठा व्हावा यासाठी लागणार निधी मी माझ्या आमदार फंडातून देणार असल्याची ग्वाही आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. दस्तुरी येथील पंचमुखी हनुमान मंदिरालाही त्यांनी भेट देऊन दर्शन घेतले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply