अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मंगळवारी (दि. 23) मतदान होणार असून, मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने व आस्थापना वगळून सर्व दुकाने, आस्थापना तसेच कारखान्यांतील कामगार, कर्मचारी व अधिकार्यांना मंगळवारी पगारी सुटृी देण्यात येत आहे. ही सुट्टी जे मतदार कामासाठी रायगड जिल्हा मतदारसंघाबाहेर असतील त्यांनादेखील लागू असेल. तसेच सर्व केंद्र, राज्य, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनादेखील ही सुट्टी लागू आहे.