Breaking News

अलिबागमधील रुग्णाचा मृत्यू; पनवेलमधील रुग्णसंख्या चारशेपार

अलिबाग, पनवेल, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
अलिबाग तालुक्यातील बहिरोळे-मापगाव येथील 51 वर्षीय व्यक्तीची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली.  उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी (दि. 19) मृत्यू झाला. अलिबागमधील कोरोना पॉझिटिव्हचा हा पहिलाच मृत्यू आहे. ही व्यक्ती कॅन्सरबाधित होती. याशिवाय जिल्ह्यात मंगळवारी 25 रुग्ण आढळले. त्यात पनवेल महापालिका हद्दीतील 18, पनवेल ग्रामीणमधील दोन, पेण तालुक्यातील तीन आणि उरण तालुक्यातील दोन अशा 25 जणांचा समावेश आहे.
नव्या रुग्णांमुळे पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या 289, ग्रामीण 116 आणि दोन्ही मिळून तालुक्यात 405 झाली, तर जिल्ह्याचा एकूण आकडा 571वर पोहचला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply