Breaking News

मंडप डेकोरेशनवाले आर्थिक संकटात

कोरोनामुळे अनेक लग्नसोहळे लांबणीवर

चिरनेर : रामप्रहर वृत्त

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाकडून सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी बंदी घातली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर मंडप डेकोरेशनवाले यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे अर्थिक संकटात आले असुन, या कोरोना व्हायरसमुळे ठरलेली बहुतांश लग्न रद्द किंवा पुढे ढकलली असल्यामुळे मंडप सजावटवाल्यांवर आर्थिक कुर्‍हाड पडली आहे. विवाहसोहळे हे आपल्या रितीरिवाजानुसार म्हणजे अगदी सगळे विधी, पाहुण्यांचा मानपान, जेवणावळी असे सर्व विविध प्रकारचे सोपास्कार सर्वच ठिकाणच्या लग्न सोहळ्यात होत असतात. मात्र कोरोना या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी नागरीकांना खबरदारीचा उपाय म्हणून नागरिक सार्वजनिक ठिकाणी करीत असलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे अथवा टाळणे हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन, सार्वजनिक ठिकाणी चारहून अधिक जणांनी एकत्र न येण्याबाबत जनजागृती करण्यात आली. सरकारचा हा महत्वपूर्ण निर्णय अंगिकारणाचे गरज निर्माण झाली असल्यामुळे ठरलेले विवाह सोहळे रद्द होऊन, ते लांबणीवर गेले आहेत. त्यामुळे मंडप सजावट व्यावसायिकांना सजावटीच्या ऑर्डर्स मिळाल्या नसल्याने मिळणारे उत्पन्न बंद झाले. त्यामुळे मंडप सजावट व्यावसायिकांमध्ये चिंतेत आहेत. दरम्यान, श्री महागणपती डेकोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सचिन घबाडी, साहिल मंडप डेकोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक दिपक पाटील, मंडपवाले नितीन गोंधळी, हरेष पाटील, शाम पाटील तसेच अन्य मंडप सजावटकारांनी या धंद्यात भांडवल साठी पैशाची गुंतवणूक केली आहे. मात्र एकूणच हि परिस्थिती केव्हा पूर्ववत होईल, याबाबत अंदाज बांधणे कठिण झाले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply