Breaking News

गाढी नदीकिनारी आगळेवेगळे कविसंमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथे एका आगळ्यावेगळ्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य कलामंच पनवेलतर्फे गाढी नदीकिनारी निसर्गाच्या सान्निध्यात हे कविसंमेलन रंगले. या वेळी अध्यक्षस्थानी माजी कारागृह अधीक्षक संजय जाधव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक ज्येष्ठ साहित्यिक गजलकार रोहिदास पोटे होते.

या संमेलनामध्ये नवकवींनी आपल्या कविता सादर केल्या. त्यामध्ये कवी जालिंदर खरे, नंदू हिवाळे, आराख सर, डॉ. मुकेश वानखेडे, कैलास खंदारे, संजय जाधव, वानखेडे सर यांनी कविता सादर केल्या. वानखेडे मॅडम व शेळके मॅडम यांनी गीत गाऊन रसिकांची मने जिंकली. रोहिदास पोटे यांनी आपल्या कवितेद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास खंदारे यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता संजय जाधव यांनी कवितेद्वारे उपस्थितांचे आभार मानून केली. यानंतर रोटगे, वरण, वांग्याची चवदार भाजी, भात, त्यावर साजूक तूप असा जेवणाचा आस्वाद रसिकांनी घेतला. कविसंमेलनाला रंगनाथ इंगळे बुलडाणा येथून आले होते. गजानन मोरे, तुषार जाधव यांनी विशेष योगदान दिले. संमेलनासाठी शेळके, कांबळे सर, भगवान वानखेडे, मंगेश वानखेडे, शुभम, क्षितिज, राठोड सर, चोपडे सर आणि महिला मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply