Breaking News

पेण कासूमध्ये एकतर्फी प्रेमातून मुलीसह कुटुंबीयांना धमकी; प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

पेण : प्रतिनिधी – एकतर्फी प्रेमातून पेण तालुक्यातील कासू येथील फिर्यादी मुलगी व तिच्या कुटुंबीयांना रावे येथील आरोपीने धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडखळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कासू यांना आरोपीसोबत लग्न करावयाचे नसतानासुद्धा आरोपीने 15 ते 19 मार्चदरम्यान फेसबुक अकाऊंटवर त्यांचे एकमेकांसोबत असलेले फोटो अपलोड केले तसेच फिर्यादीचा पाठलाग करून व त्यांच्या घरासमोर येऊन तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी देऊन फिर्यादी, साक्षीदार व तिचे वडील यांना शिवीगाळ केली. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्याच्या हवालदार धूपकर अधिक तपास करीत आहेत.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply