Breaking News

खोपोलीत संशयिताची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

खोपोली : बातमीदार – कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव शहरातून खोपोलीत दाखल झालेल्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. ताप व अन्य त्रास होत असल्याने या व्यक्तीची कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरुवारी उशिरा प्राप्त झाला. हा अहवाल निगेटीव्ह असल्याने नगर परिषद प्रशासन आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या घटनाक्रमाने पालिका प्रशासन व संबंधित व्यक्ती ज्या भागात आली त्या भागातील नागरिकांमध्ये कमालीची चिंता व भीतीचे सावट निर्माण झाले होते, परंतु या व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची अधिकृत माहिती पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी गुरुवारी उशिरा दिल्यावर शहरात निर्माण झालेली भीती व ताण-तणाव निवळला.

पाटणसई ग्रामपंचायत हद्दीत 48 जण क्वारंटाइन

नागोठणे : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे विभागातील पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये आठवडाभरात बाहेरगावांतून 48 नागरिक आले असून, त्यांना संबंधित गावांमधील शाळा तसेच काही जणांना होम क्वारंटाइन केले असल्याची माहिती सरपंच माधवी गायकर आणि रोहे पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद गायकर यांनी दिली. पाटणसई 15, चिकणी 12, गोडसई 11, वजरोली सहा आणि वासगाव चार अशा एकूण 48 नागरिकांना संबंधित गावांमध्ये क्वारंटाईन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाटणसई ग्रामपंचायत कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे व याठिकाणी या सर्वांची नोंद करण्यात आली आहे. हा कक्ष 24 तास कार्यरत असून या सर्व नागरिकांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी केली गेली आहे. या सर्व कार्यात आशासेविकांचे विशेष सहकार्य मिळाले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply