Breaking News

आयुक्तांकडून महापालिका हद्दीत पाहणी

पनवेल : वार्ताहर

नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पनवेल परिसरात असलेल्या पनवेल महानगरपालिकेचे कोविड केअर सेंटर, डेडीकेटेट कोविड हेल्थ सेंटर, डेलीकेटेड कोविड हॉस्पिटल यांना भेटी देऊन संभाव्य परिस्थितीची अगदी बारकाईने

पाहणी केली.

डॉक्टर, परिचारिका, अधिकारी, तसेच तेथील कर्मचारी यांच्याशी थेट संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले तर कामोठे या भागातील सध्याची रूग्णांची वाढती संख्या पाहता कामोठे कंटेन्मेंट झोनची देखील पाहणी करून योग्य ती खबरदारी व उपाययोजना कशा प्रकारे करावी याची सुचना संबंधीत अधिकारी वर्गाला देण्यात आली. सुधाकर देशमुख हे उल्हासनगर येथे कार्यरत असताना कोरोना या महामारीवर नियंत्रण ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तपदी ते येताच उल्हासनगरच्या आर्थिक दिवाळखोरीचा लेखाजोखा त्यांनी श्वेतपत्रिकेद्वारे जगासमोर आणला व सर्वांना खडबडून जागे केले. अनावश्यक काम रद्द करणे, पुर्वी झालेल्या व सुरू असलेल्या कामांचे थर्डपार्टी ऑडिट करणे या कार्यपद्धतीमुळे ठेकेदार व महापालिकेतील गोल्डन गॅन्गवर जरब बसवली. चिक्की, महिला बालकल्याण समिती अंतर्गत अंगणवाडीच्या मुलांसाठी निघणारे टेंडर, खेमानी येथील अनधिकृत व मनमानी पद्धतीने मंजूर झालेल्या तीन कोटीच्या शाळा इमारतीचे काम रद्द करणे, यासारखे धडाकेबाज निर्णय घेऊन आपला ठसा उमटवला. यंदाच्या अर्थसंकल्पाचे वस्तुनिष्ठ चित्र त्यांनी सर्वांसमोर ठेवले, ते स्वतः कार्यालयीन शिस्त व वेळेचे बंधन पाळत होते, म्हणून प्रशासनावर त्यांची पकड होती. असे आयुक्त पनवेल महानगरपालिकेला लाभल्याने पनवेलच्या विकासासोबतच कोरोनाच्या संकटावर नक्कीच मात करतील, असा विश्वास नागरीक व्यक्त करीत आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply