मुंबई ः ज्येष्ठ निरूपणकार, स्वच्छतादूत, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना बुधवारी(दि. 4) मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अप्पासाहेब सध्या 74 वर्षांचे आहेत. त्यांची नियमित आरोग्य तपासणी दरवेळी पुण्यातील एका रुग्णालयात होत असते. या वेळी प्रथमच ती मुंबईतील लीलावती रुग्णालयात होणार आहे. त्यामुळे श्रीसदस्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, अप्पासाहेबांची प्रकृती ठणठणीत असून काळजी करण्यासारखे काही नाही. शुक्रवारपर्यंत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले आहे, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
Check Also
विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर
उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …
RamPrahar – The Panvel Daily Paper