Breaking News

…अन् तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको हद्दीतील एका मोठ्या सोसायटीतील टूबीएचकेमध्ये राहणारे कुटुंब. घरात नऊ वर्षाच्या छोट्यापासून 90 वर्षाच्या पणजी पर्यंतची सहा माणसे कर्ता पुरुष नाही. ती, तिची दोन लहान मुले, सासू सासरे आणि 90 वर्षाची आजेसासू. ती खाजगी स्कूलमध्ये नोकरी करून घर चालवते. कोरोंनाच्या लॉकडाऊनमुळे पगार नाही. घरात खायला काहीच नाही. मोठ्या सोसायटीत राहत असल्याने मदत कोण देणार आणि मागायची कशी असा प्रश्न तिच्यापुढे पडलेला. अखेर दोन लहान मुलांची आणि सासू-सासर्‍यांची अवस्था पाहून तिने आपल्या एका सहकारी मैत्रिणीला परिस्थिती सांगून मदत मागितली. नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचेकडून आलेली ती मदत पाहून तिच्या डोळ्यांत आनंदाश्रु तरळले. 

तिच्या पतीचे दोन वर्षापूर्वी हृदय विकाराने निधन झाले होते. पतीला मुंबईत चांगली नोकरी असल्याने पनवेलमध्ये टूबीएचके ब्लॉक घेतला होता. त्याच्या अचानक निधनानंतर नातेवाईकांनी पाठ फिरवली. पदरी दोन लहान मुले, सासू -सासरे आणि आजे सासू राहायला फक्त छप्पर उरले. स्वत:चे शिक्षण कमी असले तरी एका खाजगी स्कूलमध्ये नोकरी सुरू केली. दोन वर्षे अनेक अडचणीला तोंड देत सगळ्यांचा सांभाळ करीत होती.

कोरोना, लॉकडाऊनमुळे स्कूल बंद झाले. दोन महिने पगार ही नाही. घरात खायला काही नाही. लहान मुले आणि सासू-सासर्‍यांना काय खायला द्यायचे तिच्यापुढे प्रश्न उभा राहिला. अखेर तिने आपल्या नवी मुंबईत राहणार्‍या सहकारी मैत्रिणीला फोन केला. तिने आपल्या ओळखीच्या पत्रकाराला मदत करायला सांगितले त्याने नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांना परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी तिच्या घरी धान्य आणि इतर सामुग्रीच्या दोन पिशव्या पाठवून दिल्या ते पाहिल्यावर तिचे डोळ्यांत आनंदाश्रु आले.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply