Breaking News

उद्धव ठाकरेंनी पीपीई किट घालून बाहेर पडावे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

पुणे ः प्रतिनिधी
राज्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस गडद होत असून, त्याचा अतिरिक्त भार आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. राज्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पीपीई किट घालून घराबाहेर पडत कारखानदारांच्या भेटीगाठी घेण्याचा सल्ला दिला आहे.
पाटील यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर टीका केली. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन सगळे केंद्रावर फाडून मोकळे व्हायचे. मग तुम्ही काय करता? रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करायला 19 दिवस लागतात. गुजरात सरकारने तो कालावधी चार दिवसांवर आणला. तशी वेगळी मशिनरी उभी केली. आता 22 तारखेनंतर खूप इंजेक्शन उपलब्ध होतील, कारण अडीच कोटी इंजेक्शन फॅक्टरीमध्ये तयार आहेत. पण ती 19 दिवसांशिवाय बाहेर काढता येत नाही. गुजरातने नवीन युनिट उभे केले आणि ते चार दिवसांवर आणले. उत्तर प्रदेशात ऑक्सिजन निर्मितीची केंद्र सुरू झाली. महाराष्ट्रात ऑक्सिजन तयार करण्याच्या प्लांटचा पैसा पडून आहे. हे कधी सांगणार? प्रत्येक वेळी केंद्राकडे तुमचे काय कर्तृत्व आहे? उद्धव ठाकरेंनी पीपीई किट घालून बाहेर पडावे आणि कारखानदारांच्या भेटीगाठी घ्याव्यात, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला.
विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेमध्ये तशी तरतूद आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कुणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का? आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतली तर चुकले कुठे, असा सवालही पाटील यांनी या वेळी उपस्थित केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply