कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुका मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यासाठी 24 तास सुरक्षा देणार्या पोलीस दलासाठी आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन कर्जत मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप केले. आयुर्वेद व्यासपीठ आणि जनकल्याण समिती यांचा या कार्यात सहभाग होता. कर्जत येथे पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर तसेच पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या उपस्थितीत कर्जत मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. शार्वानी कुलकर्णी, असोसिएशनच्या खजिनदार डॉ. जया रेडकर, तसेच डॉ. स्वप्नील पडते यांनी 160 पोलिसांना आयुर्वेदिक गोळ्यांचे इम्युनिटी बूस्टर दिले. त्यानंतर कर्जत मेडिकल असोसिएशनचे पथक हे नेरळ पोलीस ठाण्यात पोहचले. तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत 70 पोलिसांना कर्जत मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. कुलकर्णी यांच्यासह सहसचिव डॉ. जयश्री देशमुख, सहखजिनदार डॉ. शीतल कराळे आदींच्या हस्ते पोलिसांना आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी डॉ. श्रीकांत डहाके, आशुतोष कुलकर्णी, हेमंत शेवाळे, आशिष कर्वे तसेच जनकल्याण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कर्जत मेडिकल असोसिएशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …