पनवेल : रामप्रहर वृत्त
डिएफपीसीएल अर्थात दीपक फर्टीलायजर्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने तळोजा पोलीस विभागाला चार संगणक आणि प्रिंटर भेट दिले.
दीपक फर्टीलायजर्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, ही भारतातील अग्रगण्य औद्योगिक रसायन आणि खतनिर्माता कंपनी असून या कंपनीने तळोजा पोलीस विभागाला चार संगणक आणि प्रिंटर भेट देण्यात आले आहेत. महासाथीत पोलिसांनी कार्यतत्पर सेवा दिली, त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हि भेट देण्यात आली आहे.
या वेळी डीएफपीसी प्रतिनिधी म्हणून अरुण शिर्के, एव्हीपी, कॉर्पोरेट अफेअर्स आणि जयश्री काटकर, एव्हीपी ह्युमन रिसोर्सेस उपस्थित होते. या दोघांनी तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण आणि तळोजा वाहतूक शाखेचे पीआय महेश पाटील यांच्याकडे संगणक आणि प्रिंटर सूपूर्द केले.
या वेळी बोलताना डीएफपीसीएलचे अध्यक्ष, निर्माता डीएसआर राजू म्हणाले की, आपल्या पोलीस विभागाने आपण सर्व तसेच जिल्ह्याला सुरक्षित ठेवण्यासाठी अविरतपणे शौर्याचे काम केले आहे. त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. आमच्या रक्षणासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावणार्ययांचे सक्षमीकरण करताना आम्हाला मोठा आनंद होतो आहे. या योगदानामुळे नवीन माहिती तंत्रज्ञान साहित्य आणि कौशल्यासोबत पोलीस विभागाला सध्याच्या वेगाने ताळमेळ राखणे शक्य होणार आहे. यामुळे पोलीस विभाग भवितव्याच्या दृष्टीने सज्ज होईल, असेही त्यांनी नमूद केले.