Breaking News

पनवेलच्या पटवर्धन रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

पनवेल : वार्ताहर

पनवेल येथील रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचालित डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रूग्णालयात अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचालित डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रूग्णालय हे परिसरातील अनेक गरजू लोकांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहे. नुकताच घडलेला हा प्रसंग, अरुण कांबळे नावाच्या रुग्णाला डॉ. गिरिश गुणे यांनी पटवर्धन रुग्णालयात पाठवले. रुग्ण जवळ जवळ बेशुद्ध अवस्थेत होता. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी रुग्णाची प्राथमिक तपासणी करून आयसीयू मध्ये रुग्णास दाखल केले. डॉ. विरती शहा (निरोफिजीशियन) यांनी रुग्णाची तपासणी केली. रुग्णाला चार दिवसांपूर्वी उलट्या होत होत्या. नंतर रुग्णाने माणसे ओळखणे बंद केले व नंतर हालचाल करणेच थांबले. यामुळे सर्व तपासण्या करून रुग्णाचा सीटी स्कॅन केला व मेंदूचे आँपरेशन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले व तसे डॉ. दिप्पाल जाधव (निरोसर्जन) यांना रुग्णालयात बोलवण्यात आले. त्यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना मेंदूच्या शस्त्रक्रियेबाबत माहीत दिली व नातेवाइकांनी लगेचच मान्यता दिल्यामुळे ताबडतोब ऑपरेशन करण्याचा निर्णय केला. आजपर्यंत अशा रुग्णाला आँपरेशनसाठी दुसर्‍या रुग्णालयात पाठवत येत असे, पण रुग्णालयात असलेले अद्यायावत थिएटर बघून डॉ. जाधवांनी ही शस्त्रक्रिया पटवर्धन रुग्णालयातच करण्याचा निर्णय घेतला. ही सुरुवात कधीतरी होणे गरजेचे होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. दोनच दिवसांत रुग्णाला सामान्य कक्षात हलवण्यात आले व रुग्ण बरा होवून घरी गेला. रुग्णाच्या नातेवाईकांच्या चेहर्‍यावर आनंद जाणवत होते व त्यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टर, कर्मचारी यांचे आभार मानले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply