Breaking News

स्त्री शक्तीतर्फे मुद्रा लोन कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

स्त्री शक्ती फाऊंडेशन आणि घाटी मराठी संघटना महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती नवी मुंबई आयोजित मुद्रा लोन प्रत्यक्ष कार्यशाळा व मार्गदर्शन मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे वर्षा भोसले, संचालिका  सीताराम रोकडे, सिडकोमा रघुवंशी, राहुल हनुवंते, खादी ग्रामोद्योग अधिकारी धनंजय गायकवाड, प्युअर करिअर संचालक कोळी, सुभाष गायकवाड, दिगंबर गुजर आदी उपस्थित होते.

प्रामुख्याने ज्या ग्राहकांना मुद्रा लोन मिळवण्यासाठी ज्या अडचणी येत होत्या, त्या दूर व्हाव्या म्हणून आयोजित केला होता. कार्यक्रमात 200हून अधिक लोक सहभागी होते. त्यात बर्‍याच जणांनी आपल्याला आलेल्या अडचणी, प्रश्न विचारून त्यावरील उत्तरे विचारली, तसेच स्वच्छता दिवस म्हणून आपण समितीच्या वतीने पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कामगार यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख गायकवाड यांनी केले, तर आभार अध्यक्ष विजया कदम यांनी मानले.

समितीचे अध्यक्ष संतोष गायकवाड, उपाध्यक्ष पंकज सूर्यवंशी, संतोषी चव्हाण, राजश्री कदम, योगेश मोहन, शुभांगी निर्मळ, प्रसाद हनुमंते, अक्षय शेलार, अनिता चिखल, वृषाली, गीता नाईक या लोकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला लोकांचा उस्फूर्त सहभाग मिळाल्याने उपस्थितांचे स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्ष विजया कदम यांनी आभार मानले.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply