Breaking News

श्रीराम मंदिर उभारणीसाठी गोविंद गुणेंकडून 1 लाख 111ची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त

अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीकरिता पनवेलचे ज्येष्ठ डॉ. गोविंद गुणे यांनी 1 लाख 111 रुपयांचा मदत निधी दिला आहे. हा धनादेश डॉ. गुणे यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी प्रतिथयश डॉ. गिरीष गुणे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी उपस्थित होते. डॉ. गुणे यांचे रुग्णालय वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी रूपाने काम करीत आहे. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून पनवेल, रायगड, नवी मुंबईसह राज्यभरात त्यांची ख्याती आहे.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply