Breaking News

रोह्यात मालसई येथे आढळला कोरोनाचा रुग्ण

रोहे : प्रतिनिधी

रोह्यात बुधवारी मालसई येथे कोराना बाधित व्यक्ती सापडल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. रोह्यात मालसई येथे कोरोना बाधीत सापडल्याने रोह्यात खळबळ उडाली आहे. रोह्यात कोरोना बाधीतांची संख्या आता 14 वर पोहचली आहे. मालसई येथे आढलेला कोरोना बाधित व्यक्ती मुंबई येथुन गावी आला होता. त्याला खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने रविवारी त्याला पनवेल येथे उपचारासाठी पाठविले होते. ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल बुधवारी आले आहे. त्याच्यावर पनवेल येथे उपचार चालु आहेत. रोहा तालुक्यात आता कोरोना बाधितांची संख्या 14 झाली असुन रोहा तालुक्यात शासन व आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply