Breaking News

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना ‘शिवगिरी’ची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त

लॉकडाऊनमध्ये विचुंबे येथे राहत असलेल्या 19 जणांच्या कामगार कुटुंबीयांना अन्न-धान्य आणि रोख आर्थिक मदत नुकतीच श्री शिवगिरी सेवा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हे कामगार रत्नागिरी जिल्ह्यातील रहीवासी आहेत, पण सध्या कंपन्या व वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते आणि शिवगिरी संस्थंचे साधक मिलिंद सुर्वे यांना समजताच त्यांनी स्वतः ही बाब श्री शिवगिरी संस्थचे संस्थापक अध्यक्ष दीलीप खोत यांना सांगितली. त्यानुसार खोत यांनी अन्नधान्य आणि आर्थिक मदत मंडळाच्या वतीने केली. ही मदत कामगार बंधूच्या वतीने निलेश पताडे यांनी स्वीकारली.

श्री शिवगीरी सेवा संस्थांनने यापूर्वी देखील अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत, अनेक गरजूंना मदतीचा हात दिलेला आहे.  धार्मिक विधी शिवानंद प्रभू, प्रसाद खोत, मिलिंद पांचाळ, संदीप जाधव, बाळा तोडवळकर, तर आर्थिक व्यवहारप्रतीभा धामापुर कर(वकील), धामापुरकर काका, गिरीष गव्हाणे, राजु खोत, क्रीडा विभाग अरुण लक्ष्मण पाटकर (रायगड जिल्हा पॉवर लिफ्टींग, सचिव), उदय सावंत, राहळ गजरमल आदी कार्यकर्ते सांभाळत आहेत. या मंडळींना आखिल विश्व साधू संघटना अध्यक्ष 1008 श्री शांतीगिरी महाराज (गुजरात) यांचे प्रोत्साहन मिळते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply