Breaking News

उरण नगर परिषदेकडून गटार आणि नालेसफाई

उरण : वार्ताहर

उरण नगरपरिषदेने दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरुवात केली असून उरण नगरपरिषद हददीतील,शहरातील  गटारे, नाले साफ करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

पावसाळ्यात शहरामध्ये, ज्या ठिकाणी पाणी साचते पाण्याचा निचरा होत नाही, अशी ठिकाणे पाहून त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन  गटारे चोकअप होऊ नये त्यासाठी गटारातील गाळ, कचरा काढून त्याची पाहणी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करतानाही या कामांना प्राधान्यांने सुरुवात केली आहे.

उरण नगरपरिषद हददीतील गटारे, नाले सफाईचे काम जोरात सुरु आहे. गटारातील कचरा, माती, गाळ काढला जात आहे. नागरिकांना पावसाच्या पाण्याचा त्रास होऊ नये ह्याकडे  हेमंत वाजेकर, धनेश कासारे, महेंद्र साळवी, हरेश जाधव आदी सुपरवायझर जबाबदारीने लक्ष देऊन काम करून घेतांना दिसत आहेत.

पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडून गटारे चोकअप होऊ नये, रस्त्यावर पाणी येऊ नये. घरामध्ये पाणी घुसू नये त्याकडे नगरपरिषद विशेष लक्ष देत आहेत. कोणतीही वित्त व जीवित हानी होऊ नये, नागरिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये. नागरिकांचे संरक्षण व्हावे या करिता दरवर्षी उरण नगरपरिषदेकडून मान्सून पूर्व कामे केली जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही कामे सुरु करण्यात आली आहेत. ही कामे सुरु असताना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन उरण नगरपरिषदचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले आहे.

या कामी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, उरण शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, उरण नगरपरिषद मुख्याधिकारी अवधूत तावडे, आरोग्य सभापती रजनी सुनील कोळी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, आरोग्य निरीक्षक महेश लवटे, सफाई कामगार आदींचे सहकार्य मिळत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply