Breaking News

पमपा हद्दीत 147 इमारती सील

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पनवेल महापालिकाकडून आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांच्या 147 इमारती सील करण्यात आल्या आहेत. इमारत परिसरात नियमाचे पालन करून 28 दिवसांचा कोरोना विषाणू बाधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन)म्हणून जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 28 मेपर्यंत 448 वर गेला आहे. यातून 273 जण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. उर्वरित 154 जणांवर उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 21 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पनवेल परिसरासह कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, तळोजा परिसरात कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे.

खारघर येथेही रुग्णसंख्या अधिक आहे. कामोठे येथे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यामुळे 8 मेपासून संपूर्ण शहर कंटेन्मेंट झोन जाहीर केले होते. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी एमजीएम रुग्णालय परिसर व औद्योगिक वसाहत वगळता मंगळवारी कंटेन्मेंट झोन खुला करून दिला आहे. नागरिकांना अडथळे निर्माण होत असल्यामुळे यापुढे कोरोनाबाधित इमारतींना सील करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. याअगोदर कळंबोली, नवीन पनवेल, खारघर, तळोजा हा संपूर्ण परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर न करता, इमारती सील केल्या आहेत.

पनवेल पालिका परिसरात बुधवारपर्यंत 147 इमारती कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत परिसरातून ये-जा करण्यास मनाई आहे. 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंटेन्मेंट झोन खुले करण्यात येत आहेत.

कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित इमारती

पनवेल                   14

नवीन पनवेल                       24

कळंबोली                               22

कामोठे                   57

खारघर                  25

खारघर (घरकुल) 04

तळोजा                  01

एकूण                     147

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply