Breaking News

पनवेलमध्ये कोरोनाचे 28 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी 25 व ग्रामीण भागात तीन असे एकुण 28 नवे रुग्ण आढळले आहे. तर महापालिका क्षेत्रात खांदा कॉलनी, ग्रामीणमध्ये चिखले आणि उलवे येथील प्रत्येकी एक अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जणांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये विचुंबे, उलवे आणि पळस्पे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 656 रुग्ण सापडले असून 396 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 31 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी खांदा कॉलनीतील कन्हैया अपार्टमेंट मधील 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिला क्षय रोग आणि लिव्हरचा विकार असल्याचे समजते. कामोठ्यात सर्वाधिक 11 रुग्ण सापडले आहेत. यामध्येभायखळ्यातील बालाजी हॉस्पिटलमधील एका डॉक्टरचा समावेश आहे. सेक्टर 34 मधील संस्कृती सोसायटीतील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. कळंबोलीमध्ये सहा नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये रोडपाली  आणि आसूडगाव मधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

खारघरमध्ये चार नवीन रुग्ण सापडले असून त्यामध्ये तळोजा नावडे येथील एकाचा समावेश आहे. नवीन पनवेलमध्ये तीन नवीन रुग्ण सापडले आहेत सेक्टर 13 मधील बी 10 /12 मधील एका दोन वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. तिच्या आईपासून तिला संसर्ग झाला असावा. सेक्टर 4 मधील पुष्प वर्षा सोसायटीतील एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.  पनवेल महापालिका क्षेत्रात आजपर्यंत 2666 टेस्ट करण्यात आल्या 473  जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 113 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. 282 रुग्ण बरे झाले असून 169  रुग्णावर उपचार सुरू आहेत. 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

पनवेल ग्रामीणमध्ये शुक्रवारी दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिखले येथील 79 वर्षीय वृद्धासह उलव्यातील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधील 26 वर्षीय व्यक्तीचा त्यामध्ये समावेश आहे. विचुंबे येथील ओमकार कृष्णा पार्क येथील 20 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. या महिलेच्या कुटुंबातील एक सदस्य आधीपासून कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्या संपर्कातून या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच उलवे, सेक्टर-29, प्लॉट नं 89, व्हिक्टोरीया कासा सोसायटीतील 59 वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाली आहे. गॅरेज मेकॅनिक असलेल्या या व्यक्तीला कुटुंबातील कोरोनाबाधित सदस्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याशिवाय पळस्पे येथील 47 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती पळस्पे येथील कंटेनर गेटमध्ये कार्यरत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. ग्रामीण भागात 449 टेस्ट घेण्यात आल्या असून 32  टेस्टचे रिपोर्ट बाकी आहेत. आतापर्यंत 183  रुग्ण सापडले असून त्यापैकी 114 रुग्णानी कोरोनावर मात केली असून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 60 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply