अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढ होत असताना दुसरीकडे इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 500हून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे कोविड-19विरुद्धचा लढा जिंकता येतो, हा विश्वास वृद्धिंगत होताना दिसत आहे.
कोविड-19ने बाधित झालेले आणि आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर व उपचारांना प्रतिसाद देऊन बर्या झालेल्या नागरिकांची संख्या गुरुवारअखेर 538 झाली आहे. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 272, पनवेल ग्रामीण 114, उरण 130, अलिबाग सहा, श्रीवर्धन पाच, कर्जत तीन, खालापूर, व पेण प्रत्येकी दोन, तर माणगाव, तळा, महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातून तीन हजार 266 नागरिकांचे स्वॅब मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. तपासणीअंती त्यापैकी दोन हजार 240 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले, तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणार्या नागरिकांची संख्या 70 आहे.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …