Breaking News

एमपीएससीच्या कामकाजात राज्य सरकारचा राजकीय हस्तक्षेप

पनवेलमध्ये अभाविपकडून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) 14 मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा गुरुवारी अचानकपणे पुढे ढकलण्यात आली. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पनवेल महानगर व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन अभ्यासिका ते पनवेल तहसील कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहून शासनाने परीक्षेची तारीख जाहीर केली. यामुळे हा मोर्चा स्थगित करत शासनाच्या या गोंधळाबाबत निषेध सभा घेत राज्यशासना विरोधात अभाविपने आक्रोश व्यक्त केला.

या वेळी राज्य सरकारच्या कारभाराबाबत स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. ज्या कोविडचे कारण देत आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या नावावर परीक्षा पुढे ढकलल्या त्या विभागाच्या मंत्र्यांना याबाबत काही माहिती नसणे? राज्य सरकार आरोग्य भरती, 10वी, 12वी परीक्षा, केंद्र सरकारच्या परीक्षा ऑफलाइन घेत असताना राज्यसेवेसाठीच आडकाठी का? आठ दिवसांत कोरोना संपणार आहे का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित करत यामागे राज्य सरकारचा काही राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न होता का? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.अभाविपचे उत्तर रायगड जिल्हा संयोजक यश म्हात्रे यांनी सरकारच्या या सर्व सावळ्या गोंधळाबाबत राज्य सरकारचा जाहीर निषेध केला. राज्य सरकारने स्वायत्त शैक्षणिक क्षेत्रात करत असलेला राजकीय हस्तक्षेप बंद करावा, अशी भूमिका त्यांनी या वेळी मांडली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply