Breaking News

“मराठवाड्याला दुष्काळमुक्त करू”

मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांची नांदेडमध्ये घोषणा

नांदेड : प्रतिनिधी
नांदेडमध्ये शनिवारी (दि. 17) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण करून शहिदांना मानवंदना दिली. या वेळी त्यांनी विकासाचा अनुशेष भरून काढून मराठवाड्याला राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊ, लवकरच हा विभाग दुष्काळमुक्त करू, अशी घोषणा केली.
मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा स्वातंत्र्यवीरांना सलाम करण्याचा आजचा दिवस आहे. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. याचे कधीही स्वैराचारात परिवर्तन होता कामा नये. आपण आता जी नवराष्ट्राची निर्मिती करतोय त्यामध्ये मराठवाडा मागे राहणार नाही. मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरुन काढू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.
नागपूर-मुंबई एक्सप्रेस वेमुळे मराठवाड्यातही इकॉनॉमिक कॉरिडोअर निर्माण होणार आहे. नांदेड ते जालना हा मार्गही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी आणण्यासाठी मराठवाडा ग्रीड प्रकल्प राबवला जाईल. मराठवाड्याचा शेतकरी सुजलाम, सुफलाम करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करू, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply