Breaking News

कर्जत-खालापूरच्या 101 रुग्णांच्या डोळ्यांना पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हाताचा स्पर्श

कर्जत : बातमीदार

कर्जत आणि खालापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक रुग्णालयात नेत्र दोष असणार्‍या रुग्णांचे फॉर्म भरून घेण्यात आले होते. त्यातील 101 रुग्णांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया खुद्द पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केल्याने दोन्ही तालुक्यातील रुग्णांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाचे संचालक व जे. जे. हॉस्पिटलचे माजी डिन प्रख्यात नेत्रविशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व नेत्र विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्या हस्ते मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलमध्ये कर्जत-खालापूरमधील 101 जणांची मोफत मोतीबिंदू (बिनाटाका भिंगारोपण) शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

कर्जत-खालापूरमधील 107 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जिल्हा अंधत्व नियंत्रण रायगड आणि जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक रायगड व जिल्हा आरोग्य अधिकारी रायगड यांच्या अधिपत्याखाली सर जे जे हॉस्पिटल मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. त्यात उपजिल्हा रुग्णालय कर्जत, ग्रामीण रुग्णालय कशेळे, चौक, प्राथमिक आरोग्य केंद्र कडाव, नेरळ, कळंब, खालापूर, वावोशी, नगरपालिका दवाखाना माथेरान, खोपोली येथील नोंदणी केलेल्या रुग्णांचा समावेश होता. 23 व 24 फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ. तात्याराव लहाने यांनी आपल्या जादुई हातांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. त्यांना जे. जे. रुग्णालयातील नेत्र चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांची साथ मिळाली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply