Breaking News

कोविड रुग्णांच्या तक्रारी दूर कराव्यात -भाजप

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना त्यांना बेड न मिळणे, वेळेवर रुग्णवाहिका न मिळणे अशा अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांच्या तक्रारी दूर कराव्यात, अशी मागणी भाजपचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे व पालिका आयुक्तांना पत्र

देऊन केली आहे.

महानगरपालिकेकडे सध्या उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका पुरेशा नाहीत. त्यात खासगी रुग्णवाहिका कोरोनाबाधिताला रुग्णालयात नेण्यास थेट नाही म्हणत आहेत. त्यामुळे पालिका हेल्पलाईनला रुग्णाला फोन करावा लागतो. रुग्ण हेल्पलाईनला फोन करतात, रुग्णवाहिका येत आहे म्हणून कळवले जाते पण बरीच वाट पहावी लागते. कोरोनाबाधित रुग्ण जर अत्यवस्था नसेल तर त्याला रुग्णवाहिकेची आवश्यकताच नसते. याउलट पॉझिटिव्ह आला की त्याला रुग्णालयात सोडायलाच कुणी धजावत नाही. त्यामुळे कोणतेही चारचाकी वाहन व पीपीई किट परिधान केलेला चालक पालिकेने तयार करावेत. रुग्णाला रुग्णालयात धडधाकट रुग्णाला सोडायला हे पुरेसे आहे.

एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाला की कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत त्यांची माहिती उपलब्ध करून दिल्यास रुग्णास तातडीने मदत उपलब्ध होईल.

त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर अशी माहिती उपलब्ध करून द्यावी सिडको एक्सीबिशन सेंटरमधील रुग्णालय तातडीने सुरु करावे, अशा सूचना वजा मागण्या भाजपचे जिल्हा सरचिटणीस सतीश निकम यांनी आयुक्तांना पत्र लिहून केल्या आहेत.

Check Also

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करीत काही महिन्यांत पूर्णत्वास येणार …

Leave a Reply