नवीन पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना आदींच्या सहकार्याने प्रदूषणमुक्त पनवेल या उद्देशाने आयोजित मॅरेथॉनमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 48 विद्यार्थी (26 मुली व 22 मुले) स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्पर्धेसाठी सीकेटी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका इंदूताई घरत, पर्यवेक्षक प्रशांत मोरे व अजित सोनवणे यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, तसेच संस्थेच्या कार्यकारिणी मंडळ सदस्यांनी अभिनंदन केले.
Check Also
कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक
कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …