Monday , January 30 2023
Breaking News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या स्थानी

दुबई ः वृत्तसंस्था
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान कसोटी मालिका 1-1ने बरोबरीत सुटली आहे. दुसर्‍या सामन्यात पाकिस्तानने विंडीजचा पराभव केला. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) नवीन गुणांची आकडेवारी जाहीर केली आहे. यात भारतीय संघ पहिल्या स्थानी आला आहे.
यानंतर डब्ल्यूटीसीच्या नवीन सीझनच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ अव्वल आहे. वेस्ट इंडिजच्या पराभवाचा फायदा भारतीय संघाला झाला आणि तो 14 गुणांसह अव्वल स्थानावर पोहचला. इंग्लंड दोन गुणांसह या यादीच्या तळाशी आहे.
भारतीय संघ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद 2021-23 गुणांच्या यादीत अव्वल आहे, कारण संघाने इंग्लडविरुद्ध एक सामना जिंकला आहे, तर भारताचा एक सामना अनिर्णित राहिला होता. दुसर्‍या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे, ज्याने एक सामना जिंकला. तिसर्‍या स्थानावर विंडीज संघ आहे, ज्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजयाचे खाते उघडले आहे. इंग्लंड संघ चौथ्या स्थानावर आहे, जो भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. डब्ल्यूटीसीच्या या नवीन फेरीत इंग्लंडला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही.
संघाची क्रमवारी गुणांच्या टक्केवारीनुसार केली जाते. विजयासाठी 12 गुण, टाय सामन्यासाठी सहा गुण, अनिर्णित सामन्यासाठी चार गुण दिले जातात.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply