Breaking News

कर्जत तालुक्यात रुग्ण वाढले

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30वर

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 30वर पोहचली असून दोन नवीन रुग्णांची त्यात भर पडली आहे. कर्जत शहर आणि ग्रामीण भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला असून ते दोन्ही रुग्ण तरुण असून आपल्या घरातून अंबरनाथ, बदलापूर असे रोज ये-जा करीत आहेत.

कर्जत शहरातील मुद्रे भागातील नाना मास्तर नगरमध्ये राहणारा हा रुग्ण दररोज कर्जत ते अंबरनाथ असा प्रवास करीत असून तेथे एका औषध कंपनीमध्ये कामाला आहे. या 38 वर्षीय तरुणामुळे आता कर्जत शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11वर गेली आहे, तर काही दिवस कोरोनापासून दूर असलेल्या कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागानेदेखील पुन्हा डोके वर काढले आहे. नसरापूर ग्रामपंचायतमधील गणेगाव गावातील 40 वर्षीय व्यक्ती बदलापूर येथे औषध निर्माण कंपनीमध्ये नोकरी करीत आहे. दररोज ये-जा करणार्‍या या व्यक्तीला यापूर्वीदेखील न्यूमोनिया झाला होता आणि त्यानंतर डॉक्टरांनी घरी राहून आराम करायला सांगितले होते, मात्र कडाव येथील बाजारपेठेमध्ये तो नेहमी दिसत असल्याने 6 जूनला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कडाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कर्जत शहरातील सुखम हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांपासून उपचार घेत असलेल्या तरुणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयही क्वारंटाइन करावे लागणार आहे. याबाबत कर्जत नगर परिषद प्रशासन आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालय  अंतिम निर्णय घेणार आहेत. विविध कोविड रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15 असून 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर तीन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कर्जत तालुका प्रशासनाने खबरदारी घेण्यात कोणतीही कसूर सोडली नसून तालुक्यात पूर्वीसारखेच लॉकडाऊनचे नियम पाळले जात आहेत.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply