Breaking News

मल्टी स्किल ट्रेनिंग सेंटर कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित

स्थानिक लोकांसाठी जेएनपीटीचा पुढाकार

उरण : रामप्रहर वृत्त – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)ने बोकडवीरा येथील बहु-कौशल्य प्रशिक्षण केंद्राला 120 बेड आणि रुग्णवाहिका सेवेसह कोविड केअर हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केले आहे आणि स्थानिक समुदायाच्या संरक्षणासाठी ते तात्पुरते राज्य सरकारच्या स्वाधीन केले आहे.

जेएनपीटी आसपासच्या सर्व गावात व्यापक जंतुनाशक फवारणी व स्वच्छता मोहीम राबवित आहे आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या गावांच्या सरपंचांना इन्फ्रा-रेड टेम्परेचर गनही देण्यात

आल्या आहेत.

आमचे प्रशिक्षण केंद्र कोविड केअर सेंटर म्हणून राज्य सरकारच्या ताब्यात देऊन आम्ही या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी स्थानिक समुदायाची तयारी वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी म्हटले आहे.कोविड -19 विरुद्ध आपण सर्व मिळून आपण हा लढा जिंकू असेही त्यांनी नमूद केले.

लॉकडाऊन कालावधीत ही जेएनपीटी आवश्यक सेवांचा भाग म्हणून निरंतर कार्यरत आहे. 31 मे रोजी जेएनपीटी ने ओएनजीसी चे 86477.969 मेट्रिक टन ‘क्रूड ऑइल’ एमवी देशभक्त या जहाजावर लोडिंग केले.

जेएनपीटी बल्क टर्मिनलने मे 2020 मध्ये एकूण 6,50,942 मेट्रिक टन द्रवपदार्थाची हाताळणी केली आहे, जी मे 2019 मध्ये हाताळणी केलेल्या  5,74,664 मेट्रिक टनांच्या तुलनेत 13.3 टक्के जास्त आहे.

जेएनपीटीने कंटेनर हाताळणीमध्ये 274,750 टीईयूचा व्यवसाय केला आहे.

जेएनपीटीने मे – 2020 या महिन्यात 445 कंटेनर ट्रेन्स हाताळल्या, गेल्या वर्षी याच महिन्यात अर्थात मे 2019 मध्ये जेएनपीटीने 420 कंटेनर ट्रेन्स हाताळल्या होत्या ज्यामुळे रेल्वे गुणांका मध्ये वाढ होऊन तो 23.70% झाला आहे जो गेल्या वर्षी 14.91% होता.

जेएनपीटी कंटेनर टर्मिनलने 6 मे 2020 पासून रिकाम्या कंटेनरची ट्रेन आयसीडी दहेजला पाठविण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे जेणेकरून परत येताना हाजिरा येथून रिलायन्स इंडस्ट्रीजचा निर्यातीसाठीचा माल

आणता येईल.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply