दोघांचा मृत्यू; दिवसभरात 50 जण कोरोनामुक्त
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 7) कोरानाचे 22 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 50 जणांची कोरोनावर मात तर दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत 19 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये रविवारी तीन नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून सहा रुग्ण बरे झाले आहेत.
पालिका हद्दीत आतापर्यंत 44 रूग्ण बरे होवून त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात पालिका हद्दीतील रूग्णांमध्ये कामोठे आठ, कळंबोली चार, नवीन पनवेल आणि पनवेल प्रत्येकी तीन तर तळोजातील एका रूग्णाचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये उलवे दोन आणि वलप येथील एका रुग्णाचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रातील नवीन पनवेल सेक्टर 10 शिव सोनेरी सोसायटीतील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याला पूर्वीपासून मधुमेहाचा आजार होता. कामोठे सेक्टर 25 येथील एका 48 वर्षीय महिलेचा मृत्यू 29 मे रोजी झाला होता. त्याची माहिती देण्यात आली.
पनवेल शहरात तीन नवीन रुग्ण सापडल्याने पनवेलमधील रुग्णाची संख्या 48 झाली आहे. ठाणा नाका येथील रत्नदीप बिल्डिंग मधील एका व्यक्तीला संसर्ग झाला आहे. तक्का येथील श्रेयस निवास मधील व्यक्तिला कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल रेल्वे स्टेशनजवळील मालधक्का झोपडपट्टीतील महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. नवीन पनवेलमध्ये तीन नवीन रुग्ण सापडल्याने नवीन पनवेलमध्ये रुग्णाची संख्या 100 झाली आहे. सेक्टर 5 मधील हरीमहाल सोसायटीतील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. खांदा कॉलनी सेक्टर 7 सोमारी सदन येथील एका व्यक्तिला कोरोनाची लागण झाली आहे.
कामोठेमध्ये आठ नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 265 झाली आहे. कामोठे सेक्टर 22 हवे निर्मितीमधील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कामोठेमधील आजच्या रुग्णात दोन हॉस्पिटलमधील कार्यरत असलेल्या व्यक्ति असून त्यातील एक पूर्ण बरी झाली आहे. कळंबोलीमध्ये चार नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 130 झाली आहे. नावडे खिडुक पाडा येथील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. सेक्टर 2 ई आणि रोडपाली येथील एका व्यक्तिला कोरोनाची बाधा झाली आहे. तळोजामध्ये एक नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णाची संख्या 10 झाली आहे. फेज 1 सेक्टर 10 रिध्दी-सिध्दी अपार्टमेंटमधील एका व्यक्तिला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 712 रुग्ण झाले असून 427 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 59.17 टक्के आहे. 253 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. 32 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये उलवे येथील मयूरेश डेल्टा टॉवर मधील एका नर्सला आणि श्रमिक हौसिंग सोसायटीत राहणार्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वलप येथील किराणा दुकानदाराला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पनवेल ग्रामीणमधील आजपर्यंतच्या एकूण 240 कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण 169 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाच्या 62 अॅक्टीव्ह केसेस आहेत.