Breaking News

दिघोडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उर्मिला कोळी यांची बिनविरोध निवड

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतमध्ये भाजप, शेकाप, शिवसेना परिवर्तन आघाडीची सत्ता आहे. यामध्ये परिवर्तन आघाडीचे थेट सरपंच व सहा सदस्य काँग्रेस तीन, असे पक्ष बलाबल आहे. उपसरपंचपदी असलेल्या  शारदा प्रल्हाद कासकर यांचा उपसरपंच पदाचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत उपसरपंचपदासाठी उर्मिला नरेश कोळी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी सरपंच सोनिया मयूर घरत,  माजी उपसरपंच शारदा प्रल्हाद कासकर, सदस्या कविता शिवदास म्हात्रे, पूजा अभिजीत पाटील, सदस्य शरद कोळी, कांचन घरत, कृषी सहायक  पाटील, सुमन अनिल कोळी, प्रल्हाद कासकर, राजेंद्र म्हात्रे, राजेश पाटील, दीपक कोळी, मयूर घरत, प्रकाश कोळी, शिवदास म्हात्रे, अभिजित पाटील, नरेश कोळी, पांडुरंग पाटील, सुनील माळी, अनिल कोळी,  ग्रामसेविका मच्छगंधा पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply