Breaking News

सीकेटी महाविद्यालयात रंगला जागतिक रंगभूमी दिनाचा सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून सोमवारी (दि. 27) जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे सांस्कृतिक विभागद्वारे जागतिक रंगभूमी दिन सोहळा आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये नाटक, अभिनय, लेखन आणिदिग्दर्शन यासंदर्भातील अभ्यासक रुची वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक अभिजित झुंजारराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत सवांद साधत नाट्यकला आणि त्यामुळे होणारा सर्वांगीण विकास याबद्दल खूप उपयोगी माहिती दिली. जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी या वेळी मिमिक्रीआणि स्किट सादर केली. सीकेटीएन्स फिल्म सोसायटीची स्थापना होऊन आज एक वर्ष पूर्ण झालेत्या निमित्ताने तार ही शॉर्टफिल्मदेखील विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. या उद्घाटन सोहळ्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, कला शाखा प्रमुख डॉ. बी. एस. पाटील, इंग्लिश विभाग प्रमुख डॉ. आर. व्ही. येवले, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. गीतिका तन्वर, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप आदी उपस्थित होते.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply