Breaking News

रायगड जिल्ह्यात 45 नवे रुग्ण; एकाचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 45 नवीन रुग्णांची सोमवारी (दि. 8) नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत 36, पनवेल ग्रामीणमध्ये तीन, महाडमध्ये दोन आणि उरण, खालापूर, अलिबाग व माणगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे, तर पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1454 वर जाऊन पोहोचला असून, मृतांची संख्या 63 झाली आहे. दुसरीकडे नवी मुंबईत सोमवारी 88 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तीन जणांचा मृत्यू झाला, तर 40 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. नवी मुंबईत सद्यस्थितीत दोन हजार 974 व्यक्ती पॉझिटिव्ह असून, मृतांची संख्या 92 आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply