कर्जत : बातमीदार – बदलापूर येथून बॅरिकेट तोडून आलेले गुरे चोरणार्यांच वाहन नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्या गाडीतून प्रवास करणार्यांना पकडले होते. या गाडीतील तीन जण अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्यावर मुंबई, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांत 13 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पोलिसांना चकवा देणारी ही टोळी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे राहणारे चार तरुण तवेरा गाडीने नेरळकडे येत असताना लॉकडाऊन असल्याने बदलापूर येथे पोलिसांनी लावलेले बॅरिकेट आरोपींच्या गाडीने तोडून रायगड जिल्ह्यात प्रवेश केला होता. त्या वाहनाने पुढे नेरळ येथील जिल्हा सीमा हद्दीला लावलेले बॅरिकेटही त्यांनी उडविले. त्यानंतर कर्जत पोलीस तसेच बदलापूर, नेरळ येथील स्थानिक तरुणांनी पाठलाग करून ही टोळी ताब्यात घेतली होती.
कल्याण पत्री पूल येथे राहणारे सर्व चार आरोपी 18 एप्रिलपासून पोलीस कोठडीची हवा खात आहेत. पोलिसांच्या गुप्तचर विभागाने या चारही जणांचे पोलीस रेकॉर्ड तपासले असता, त्यातील तिघे अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाहे. पोलिसांनी अटक केलेल्या चौघांमध्ये फय्याज युसूफ खान याच्यावर अद्याप कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत, परंतु तोदेखील मागील एक
वर्षांपासून गुरे चोरणार्या टोळीमध्ये सक्रिय आहे, तर अन्य तिघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत.