Breaking News

रोह्यात शासकीय इमारतींची पडझड; पंचनामे सुरू

रोहे : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाने रोहे तालुक्यात थैमान घातल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेकांच्या घरावरील छपरे, अनेक बागायतदारांची झाडे उन्मळून पडली आहेत. वादळाचा तालुक्यातील सरकारी इमारतीनाही फटका बसला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने यांच्यासह अन्य इमारतींचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे चालू आहेत.

रोहा पंचायत समिती अंतर्गत अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 237 शाळा असून, त्यापैकी 157 इमारतींची पडझड झाली आहे. या इमारतींवरील छपरे उडाली आहेत. यातील 71 इमारती पूर्ण नादुरस्त झाल्या आहेत. तालुक्यात 64 ग्रामपंचायती असून त्यांचे किरकोळ नुकसान झाले असले तरी तीन ग्रामपंचायती पूर्णपणे कोसळल्या आहेत. तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे छप्पर पूर्णत: उडाले, तर नऊ पशुवैद्यकीय दवाखान्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.

तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शासकीय इमारतींचे नुकसान झाले असून, त्यांचे पंचनामे सुरू असल्याचे पंचायत समिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply