Breaking News

उरण मोरा येथील एसबीआयचे एटीएम सुरू

उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील उरण नगरपरिषद हददीतील मोरा येथील एसबीआयचे एटीएम मशीन निसर्ग चक्रीवादळाने गुरुवार (दि.4) पासून बंद असल्याने येथील ग्राहकांची गैरसोय होत होती. या समस्येविषयी दैनिक रामप्रहर वृत्तपत्रात रविवारी (दि. 7) रोजी बातमी छापून आली आणि बँकेचे अधिकारी कामाला लागले. बुधवारी (दि.10) एटीएम मशिन दुरुस्त करण्यात आले. ग्राहकांनी दैनिक रामप्रहरला धन्यवाद दिले आहे.

एसबीआयचे एटीएम मशीन कमी दिवसात दुरुस्त झाल्याने ग्राहकांची होणारा त्रास, वेळ व उरणला जाण्यासाठी लागणारे पैसे वाचले. दैनिक रामप्रहर मुळे मशीन लवकरच दुरुस्त झाली. त्यांना मी धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया ग्राहक आकाश कडू यांनी दिली.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply