79 वाहन चालकांकडून 16 हजार 300 रुपयांचा दंड वसूल
कर्जत : प्रतिनिधी
लायसन्स बरोबर न बाळगता गाडी चालवणे, मोटारसायकलवर टीबल सीट असणे, गाडीला फॅन्सी नंबर प्लेट लावणे, सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे अशा विविध कारणावरून 79 वाहनांवर धडक कारवाई करून, जिल्हा वाहतूक शाखेने 16 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कर्जत चारफाटा येथे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुभाष पाटील, पोलीस हवालदार सुरेश पाटील, पोलीस शिपाई सुहास काबुगडे यांनी लायन्सस व गाडीचे कागदपत्र जवळ नसलेल्या 36 गाड्यांवर कारवाई करून 7 हजार 200 रुपये दंड, मोटारसायकलवर टीबल सीट असल्या 5 मोटारसायकलस्वारांवर कारवाई करून 1 हजार रुपये दंड, गाडी चालवताना सीट बेल्ट न लावणार्या 22 जणांवर कारवाई करून 4 हजार 400 रुपये दंड, क्लिनर विना गाडी चालविणार्या 5 गाड्यांवर कारवाई करून 1 हजार रुपये दंड, गाडीच्या लांबीपेक्षा जास्त माल ठेवून वाहतूक करणार्या 4 ट्रकवर कारवाई करून 800 रुपये दंड, गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट असणार्या 3 गाड्यांवर कारवाई करून 600 रुपये दंड, मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणार्या 3 गाड्यांवर कारवाई करून 700 रुपये दंड, मोटारसायकल चालवताना लायन्स नाही आणि मोबाईलवर बोलणार्या एका मोटारसायकलस्वारावर कारवाई करून 700 रुपये दंड. अशा 79 वाहनांवर कारवाई करून 16 हजार 300 रुपये दंड जिल्हा वाहतूक शाखेने वसूल केला.