Breaking News

रसायनीतील 12 रुग्ण कोरोनामुक्त

मोहोपाडा : प्रतिनिधी

कोरोना या विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला असताना रसायनी परिसरातही कोरोनाने शिरकाव करून भीती निर्माण केली होती, परंतु 12 रुग्णांनी धैर्य दाखवून या महामारीवर मात केली आहे.

रसायनी-मोहोपाडा परिसरातील शिवनगरवाडीतील तीन, भटवाडी एक, श्रीहरी पार्क (हरिओम पार्क) दोन, रिस नवीन वसाहत-दुर्गामाता कॉलनी येथे दोन, दापिवली तीन आणि वावेघरमधील एक अशा 12 कोरोना रुग्णांनी कोरोनाविरुद्धची लढाई उपचार घेऊन जिंकली. त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Check Also

पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार

महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 …

Leave a Reply