Breaking News

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते आत्मनिर्भर प्रभाग 18 दिवाळी महोत्सवाचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर

माजी उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते आत्मनिर्भर प्रभाग 18 दिवाळी महोत्सव 2020चे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत व वोकल फॉर लोकल या संकल्पनेतून आत्मनिर्भर प्रभाग 18 दिवाळी महोत्सव 2020चे आयोजन गोखले हॉल येथे करण्यात आले होते. प्रभागातील नवउद्योजक-उद्योजिका, माता-भगिनी आणि युवा मित्रांच्या स्वदेशी वस्तू व दिवाळी फराळांचे प्रदर्शन-विक्री या दोन दिवसांच्या महोत्सवात करण्यात येणार आहे. या वेळी विक्रांत पाटील म्हणाले की, प्रभागातील नवउद्योजक, उद्योजिका, युवा मित्र, माता-भगिनींच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याद्वारे प्रभागातील नागरिकांना उत्तम प्रतीच्या स्वदेशी वस्तू व खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी मिळतील आणि त्याचा फायदा प्रभागातील उद्योजकांना मिळणार आहे. आज कोरोनामुळे उद्योजकांसह सामान्य नागरिकांना झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे हा मोहत्सव या सर्व नवउद्योजकांना स्फूर्ती देण्याचे काम करणार आहे. प्रभागातील कामांना नेहमीच तत्परतेने पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. त्याचबरोबर माझ्या प्रभागातील उद्योजकांनासुद्धा प्रोत्साहन मिळावे म्हणून अशा प्रकारचे आणखीन महोत्सव यापुढेही मी आयोजित करणार आहे. प्रभागातील लोक तसेच तमाम पनवेलकरांनी या स्टॉल्सला भेट देऊन नवउद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, अशी विनंतीही विक्रांत पाटील यांनी केली आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply