Breaking News

नेवळीतील रहिवासी भाजपत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाची  विकासकामे पाहता अनेक पक्षांतील कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. या अनुषंगाने पनवेल तालुक्याती नेवाळी येथील ओम रेसीडेन्सी चिमाजी नगर येथील रहिवाशांनी भाजपत जाहीर प्रवेश केला.

माजी खाासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवून पनवेल नेवाळी ओम रेसीडेन्सी चिमाजीनगर येथील रहिवाशांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. त्यामध्ये प्रणाली गायकवाड, मोनाली गायकवाड, सोनाली गायकवाड, प्रणाली नाईक, नेहा माटे यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील उपस्थित होते.

Check Also

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …

Leave a Reply